| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील कोलाड येथील पोलीस ठाण्यात शनिवार, दि. 14 डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
कोलाड पोलीस ठाण्यात होणार्या दत्तजयंती उत्सवानिमित्ताने कोलाड परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून दत्त दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती कोलाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी वृंद यांच्याकडून करण्यात आली आहे.