दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यांतील भवानी नडगांव येथील तरुण मित्र मंडळ व भवानी नडगाव क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामस्थ, मुंबई, महिला मंडळाच्या सहकार्याने एक दिवसीय लक्षवेधी क्रिकेट स्पर्धा भैरी भवानी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यादरम्यान तालुका महाड ग्रामीण असोसिएशन यांच्या नोंदनीकृत असणाऱ्या 24 संघांनी क्रिकेट स्पर्धेला सहभाग नोंदविला. शेवटच्या अंतिम स्पर्धेत दत्तकृपा क्रिकेट संघ व जय हनुमान क्रिकेट संघ खुटील यांच्यात सामना रंगला. यावेळी दत्तकृपा क्रिकेट संघाने विजय मिळवत भवानी चषकाचा मानकरी ठरला. तर, दत्तकृपा संघाकडून मालिकावीर साहिल नाकते, फलंदाज सागर होडबे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यावेळी क्रिकेट स्पर्धेला नवनियुक्त महाड पंचायत सदस्य संदीप खेडेकर, उपसरपंच मजर देशमुख, पोलीस पाटील अनिल किजबिले, मुंबई मंडळ अध्यक्ष आनंद दवंडे, खजिनदार सोनू अगबुल, कृष्णा मोरे तसेच मुंबई व महिला मंडळ आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिल्या. यादरम्यान आयोजकांच्यावतीने सत्कार करण्यात आले.

Exit mobile version