| खेड | प्रतिनिधी |
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या कोकणातील जमिनीची सरकारकडून लिलावात विक्री केली जाणार आहे. हा लिलाव 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. खेडमध्ये दाऊदचं मूळ गाव असून तिथं दाऊदनं जमीन विकत घेतली होती, तसंच बंगलाही बांधला होता, पण ही सगळी संपत्ती आता लिलावात विकली जाणार आहे. खेडमध्ये दाऊदच्या चार जमिनी आहेत. त्यापैकी एका जमिनीची किंमत 9 लाख 41 हजार 280 रुपये, तर दुसऱ्या शेतजमिनीची किंमत 8 लाख 8 हजार 770 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. मुंबके गावात दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावावर एक बंगला आहे. या बंगल्यासमोर आंब्याची बाग आहे. तर लोटेमध्ये पेट्रोल पंपाची जागा आहे.






