| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील खेरणे गाव परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून, तिच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. या महिलेचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे, अंगाने सडपातळ, डोक्यावरील केस काळे साधारण वाढलेले, चेहरा उभट, नाक सरळ, रंग सावळा, उंची 5 फुट असून अंगात काळ्या रंगाचा फुल बाह्याचा गाऊन घातलेला आहे. तसेच, डोळे काळे आहेत. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा सहा.पो.नि.अर्चना कुदळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पनवेल परिसरात आढळला मृतदेह
