फुटपाथवर अनोळखी इसमाचा मृतदेह

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील तक्का येथील पनवेल वॉईन शॉपचे शेजारी फुटपाथवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पनवेल शहर पोलीस सदर इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 55 ते 60 वर्ष असून, त्याची उंची अंदाजे 5 फूट 6 इंच, वर्ण सावळा, बांधा सडपातळ, डोक्याचे केस, दाढी व मिशि वाढलेली पांढरी, चेहरा उभट आहे. त्याने अंगात तांबूस रंगाचा काळ्या टिपके असलेला फुल बाह्याचा मळलेला शर्ट व निळया रंगाची मळकट फुल पँट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र 022-27452333 किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार (मो.9766454245) यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version