। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील विश्राळी तलाव येथे एका इसमाचा मृतदेह आदळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या इसमाचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षे, डोक्याचे केस काळे असून, मयताच्या उजव्या हातात काळसर मण्यांची माळ, अंगात चॉकलेटी रंगाची अंडरवेअर घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नं. 022-27452333 किंवा सहा. पोलीस निरीक्षक शरद ढोले यांच्याशी संपर्क साधावा.