अनोळखी इसमाचा मृतदेह

| पनवेल | वृत्तसंस्था |

तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. या अनोळखी इसमाचे अंदाजे वय 50 वर्ष, रंग सावळा, अंगाने मध्यम, केस पांढरे, नाक सरळ, चेहरा उभट असून त्याने निळया रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आणि फिक्कट निळया रंगाची जिन्स पँट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version