अनोळखी इसमाचा मृतदेह

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. अनोळखी इसमाचे वय सुमारे 35 ते 40 वर्षे, बांधा सडपातळ, रंग निम गोरा, उंची 162 सेमी, केस सफेद व विरळ झालेले, दाढी सफेद व बारीक असून अंगात लाल रंगाचा हाफ टी शर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणालाही अधिक माहिती मिळाल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version