| पनवेल | वार्ताहर |
परिसरामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 50 ते 55 वर्षे, डोक्यास केस काळे पांढरे, समोरील दात पडलेले, चेहरा उभट, अंगावरील त्वचा वाळलेली, छातीपासून खालची त्वचा व मांस गळून पडलेले, डाव्या हाताचे हाड खांद्यापासून निघालेले, हाता पायाचा पंजे नसलेला हाडांचा सापळा असून अंगात टि-शर्ट व माचो कंपनीची अंडरवेअर परिधान केलेली. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. 022-27452333 किंवा सपोनि शांतीभूषण कामत यांच्याशी संपर्क साधावा
अनोळखी इसमाचा आढळला मृतदेह
