धक्कादायक! करंजा समुद्र किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

। उरण । वार्ताहर ।
करंजा समुद्र किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बुधवारी ( दि२१) आढळून आला आहे. सदर मुतदेह हा पुरुषाचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. करंजा समुद्र किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सदर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा चाणजे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रवि कोळी यांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य केले.

अज्ञात व्यक्तीचा सापडलेला मृतदेह उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पोस्ट माटमसाठी नेण्यात आला आहे. सदर व्यक्तीच्या अंगावर शर्ट आणि हाप पंड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस यंत्रणा तपास करत असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version