समुद्रकिनारी सापडले मृत अर्भक

। रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडा मोठे बंदर समुद्रकिनारी पाण्यात वाहत आलेले स्त्री जातीचे पूर्ण वाढ न झालेले अर्भक मृत अवस्थेत सापडले असून, याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे अज्ञाताचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अर्भक दि. 5 फेब्रुवारी रोजी सायकांळी पावणे सात वाजता वाहत समुद्रकिनारी आलेले मिळून आले. याबाबत सुरेश हाडकर यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंदविली आहे. पोलिसात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहा. फौजदार व्ही.के. सरके हे पोलिस निरीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Exit mobile version