| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा समुद्र खाडीत मासेमारी करता गेलेल्या परप्रांतीय खलाशी होंडीतून पडून बेपत्ता झाला होता, तो बेशुध्द अवस्थेत रेवदंडा समुद्र किनारी आढळून आला, तपासणी करता रेवदंडा सरकारी दवाखाना येथे दाखल केला असता, तेथे तो मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
रेवदंडा समुद्र पक्ती येथे बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी रात्री प्रदिप भांजीनाखवा यांच्या जय भवानी बोटीवर सहकारी खलाशीसह पार्टी करून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी खाडी मार्गे समुद्रात गेलेला, उत्तर प्रदेश मधील रहिवासी असलेला खलाशी प्रदिप कमजोरी हा बोटीत जेवण करण्याचे वेळी दिसून आला नाही, तो पाण्यात पडल्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचा परिसरात शोध घेतला, परंतु मिळून आला नाही, याबाबत बेपत्ता झाल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाणे येथे राहूल कुमार रामसुंदर यांनी नोंदविली होती.
या बेपत्ता खलाश्याचा शोध जारी असताना, रेवदंडा आंग्रेनगर समुद्रकिनारी शोध घेत असताना, शनिवारी (दि. 1) प्रदिप कमजोरी हा समुद्राचा पाण्यात बेशुध्द अवस्थेत मिळून आला, त्यांस त्वरीत रेवदंडा सरकारी रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरानी त्यास तपासून मृत झाल्याचे घोषीत केले. याबाबत अकस्मात मुत्यू नोंद करण्यात आली असून, रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोसई एस.आर.पडवळ हे पोलीस ठाणे इन्चार्ज श्रीकांत किरविले यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.






