गुळसुंदे येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आमरण उपोषण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर क्कारण्यात आलेले अतिक्रम हटवावे या मागणीसाठी गजाजन मालुसरे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत गुळसुंदे ते आकुळवाडी या जोड रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्यावर रहदारीस अडथळे निर्माण होतात. वाद होतात. ही अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी मी सर्व संबंधित अधिकार्‍याकडे पत्राद्वारे केली. परंतु अधिकार्‍यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. हद्दीत गुळसुंदे ते आकुळवाडी या जोड रस्त्यावरील अतिक्रमण हटवावीत व कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मी उपोषणाला बसलो आहे, असे गजानन मालुसरे यांनी सांगितले.

Exit mobile version