शिदींवाडीतील महिलेचा मृत्यू

। रसायनी । वार्ताहर ।

मोहोपाडा शिंदीवाडी येथील तुळसा भुर्‍या पवार (वय 45)या हात, पाय, दमा या आजाराने त्रस्त होत्या. आजारपण सुरुच असल्याने त्यांच्यावर चौक येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.यानंतर पुढील उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे त्यांना दाखल केले असता त्यांच्यावर उपचार चालू असताना तेथील डॉक्टरांनी तुळसा पवार यांना मयत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यातून सदर माहिती रसायनी पोलिस ठाण्याला वर्गं करण्यात आली. याप्रकणी रसायनी पोलीस ठाण्यात सिआरपी 174 प्रमाणे नोंद झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस घरत अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version