भालचंद्र जाधव यांचा मृत्यू

।रसायनी । वार्ताहर ।
भालचंद्र जाधव (वय 41)हे मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील विजपोलावरील बंद अवस्थेतील पथदिवा बदलून त्याजागी नवीन पथदिवा लावण्यास पोलावर चढला असता अचानक विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. जाधव हा गेल्या काही वर्षे ग्रामपंचायतीचे पथदिवे तसेच वीज मंडळाचे वीज मीटर लावण्याचे काम करायचे.त्याना कंत्राटी कामगार म्हणून सेवेत सामावून घेतले.जाधव यांच्या मृत्यूबाबत घरच्यांना मदत करण्याची मागणी नागरिकांनी विजमंडळाकडे केली आहे.

Exit mobile version