अभिषेक काते यांना पितृशोक

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अभिषेक काते यांचे वडिल गजानन काते यांचे वयाच्या 82 वर्षी शनिवारी (दि.27) काशिद येथील राहात्याघरी दु:खद निधन झाले.

त्यांच्या अंत्यविधीला जिल्ह्या व तालुक्यातून मान्यवर तसेच आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सुन व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवारी (दि.5) व उत्तर कार्य बुधवारी (दि.7) राहात्याघरी होणार असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version