। खांब । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील डोलवहाल गावचे रहिवासी तथा साक्षरता कार्यकर्ते व वारकरी संप्रदायाचे पाईक नामदेव देवजी सावंत यांना बुधवारी (दि.28) राहत्या निवासस्थानी अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली. त्यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह त्यांचे आप्तस्वकीय मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी शुक्रवारी (दि.8) तर अंतिम धार्मिकविधी सोमवारी (दि.11) रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.