| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पनवेलहून अलिबागकडे एसटीने येणार्या ज्येष्ठ नागरिकाचे प्रवासातच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आत्माराम नागावकर (वय 75) असे त्यांचे नाव आहे. ते मुंबईहून वढाव या गावी परतत होते. पनवेलपर्यंत ट्रेनने आल्यानंतर एसटमध्ये बसून ते येत होते. अलिबाग आगारात आल्यावर सर्व प्रवासी उतरले तरी देखील ते सीटवरच बसूनच असल्याने वाहकाने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले. नागावकर यांच्या आकस्मिक निधनाची नोंद अलिबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे वढाव गावावर शोककळा पसरली आहे.