भीम आर्मीची नेरळमध्ये निदर्शने
| नेरळ | प्रतिनिधी |
राजस्थान येथील विद्यार्थी बालक इंद्रजित मेघवाल याचा शिक्षक चैल सिंग यानी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्या घटनेचा आजाद समाज पार्टी आणि भिम आर्मी यांच्याकडून नेरळ पोलीस ठाणे येथे निषेध करण्यात आला.
राज्य उपाध्यक्ष अॅ.सुमित साबळे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेत निदर्शने करण्यात आली. आरोपीच्या विरोधात तसेच राजस्थान येथील काँग्रेस सरकार विरोधात व केंद्रातील भाजपा सरकार विरोधात घोषणा आंदोलनकर्ते यांनी दिल्या. पीडितच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून चैलसिंग या नाराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. बाजारपेठेतून हा मोर्चा पोलीस ठाणे येथे नेण्यात आला.पोलीस ठाणे प्रमुख तेंदूलकर यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात तालुका अध्यक्ष सम्यक नागसेन सदावर्ते, रायगड जिल्हा सचिव अॅड. विशाल गायकवाड, शहराध्यक्ष अनिकेत जाधव, उपाध्यक्ष भूषण गवळे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जाकीर खान, वाहतूक आघाडी अध्यक्ष मुस्तकीर मुल्ला, वरिष्ठ नेते मुझामील मणियार, तसेच रउफ पटेल, विजय जाधव, कुणाल वाघ, चेतन सदावर्ते, मुजांमील मुल्ला, सूरज अहिरे, अजय गवळे, साहिल जाधव, रफिक शेख, हरिश्चंद्र सदावर्ते, रशीद शेख, सचिन भालेराव व मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.