। पनवेल । प्रतिनिधी ।
उलवे परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या अंदाजे 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून, तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी उलवे पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला बुधवारी (दि.26) उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस स्थितीत आढळून आली होती. तिच्या पालनपोषणासाठी तिला शील आश्रम येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती ठीक नसल्याने तिला कामोठे येथील एम.जी.एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून कळविण्यात आले.
मृत महिलेचे नाव अनौळखी महिला असे नमूद करण्यात आले असून, तिचा पत्ता उपलब्ध नाही. तिचे वय अंदाजे 50 वर्षे, उंची सुमारे 150 सेंटीमीटर आहे. तिच्या अंगावर सडपातळ बांधा, चेहरा उभट, काळे व सोनेरी केस आणि उजव्या भुवईवर जखमेची खूण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच तिच्या अंगावर राखाडी रंगाचा गाऊन होता.
या महिलेची ओळख पटविण्यासाठी तसेच तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी उलवे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुश म्हस्कर तपास करीत आहेत. या महिलेबाबत कोणाला माहिती असल्यास उलवे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेवारस महिलेचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606