अण्णा हजारेंना जीवे मारण्याची धमकी

। मुंबई । प्रतिनिधी ।
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची प्रकरण समोर आलं आहे. शेतीच्या वादातून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या व्यक्तीने 1 मे रोजी आपण अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

शेतीच्या वादामध्ये अण्णा हजार यांनी मध्यस्थी करून आपल्याला न्याय द्यावा यासाठी गायधने यांनी निवेदन दिलं होतं. मदतीची मागणी केली होती, परंतु अण्णांनी माझ्या निवेदनाची दखल घेतली नाही असा आरोप करत, गायधने यांनी राळेगणसिद्ध येथे जाऊन अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं सांगितलं आहे.

Exit mobile version