| मुंबई | प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून सदर महिलेने मोदींच्या हत्येची योजना आखल्याचा दावा केला. हत्येसाठी हत्यारांची व्यवस्थाही आधीच करण्यात आल्याचे महिलेने सांगितले. आंबोली पोलिसांनी तात्काळ कॉल ट्रेस करून महिलेला अटक केली आहे. महिलेची चौकशी केल्यानंतर तसेच तिची पार्श्वभूमी तपासल्यानंतर कोणतेही संशयास्पद कनेक्शन आढळले नाही. ही महिला कौटुंबिक समस्यांमुळे तणावाखाली होती. या तणावातूनच तिने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात असे समोर आले आहे. मात्र, संभाव्य धोके टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच आहे.