सिलेंडर घरपोच करण्याकडून ग्राहकांची लूट

पनवेल परिसरात सिलेंडरसाठी एक एकशे दोन रुपये दर
। पनवेल । वार्ताहर ।
घरगुती सिलेंडरच्या किमतीत नुकतीच 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. अशातच सिलेंडर घरपोच करण्याच्या नावावर सिलेंडर घरपोच करणारे डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून ज्यादाचे पैसे उकळत असल्याने गॅस एजन्सीच्या या कारभारा विरोधात सामान्य ग्राहक संताप व्यक्त असून, सामान्य ग्राहकांना न्याय देण्याचे काम प्रशासन करणार का असा सवाल ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

घरगुती गॅस सिलेंडर च्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.केंद्र सरकारने बुधवार (ता.1) पासून गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केल्याने घरगुती गॅस सिलेंडरचे दर आता एक हजार एकशे दोन रुपयांवर जाऊन पोहचले आहेत. दर वाढीमुळे एकीकडे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबर्डे मोडले आहे. सरकारकडून घरगुती गॅस वितरित करण्याकरिता विविध एजन्सी ची नियुक्ती करण्यात येत असते. या एजन्सीना गॅस सिलेंडर ग्राहकाच्या घरा पर्यंत पोहचवण्या करिता डिलेव्हरी शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

शासनाच्या या परवानगी नुसार घरपोच सिलेंडर पोहचवण्यासाठी या एजन्सी ग्राहकांनकडून सिलेंडरच्या मूळ किमती सी जी एस टी,एस जी एस टी नुसार दर वसुल करत असते.बुधवारी करण्यात आलेल्या वाढी नुसार सद्य स्थितीत पनवेल परिसरात घरगुती सिलेंडरसाठी एक हजार एकशे दोन रुपये दर आकारण्यात येत आहे. मात्र असे असताना घरगुती सिलेंडर घरपोच करण्यासाठी एजन्सीकडून नेमण्यात आलेले कर्मचारी एक हजार एकशे एक रुपया ऐवजी एक एकशे वीस असे ज्यादाचे 18 रुपये वसुल करत असून, देयकाची पावती देण्यासाठी देखील टाळा टाळ करत असल्याने अगोदरच भाव वाढीमुळे त्रस्त असणारे ग्राहक संताप व्यक्त करत आहेत.

सिलेंडर सोबत जोडलेले असते डिलेव्हरी शुल्क
गॅस सिलेंडर च्या किमतीत सिलेंडर घरपोच करण्याचे शुल्क जोडलेले असते.सिलेंडर घरपोच करण्यासाठी अनेक एजेन्सी कर्मचार्यांची पगार अथवा कमिशन बसेस वर नेमणूक करत असते.तर काही एजन्सी पगारा सोबत अतिरिक्त कमिशन सुद्धा देते.मात्र तरी सुद्धा अनेक कर्मचारी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसुलत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत.

रद्द होऊ शकते एजन्सी
नियम 2.2.11 नुसार एखादया एजन्सी विरोधात ग्राहकांकडून किमती व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क वसुल केले जात असल्याची तक्रार पहिल्यांदा त्या एजन्सीला दंड थोटवला जाऊ शकतो दुसर्‍या वेळेस दंडाची रक्कम वाढवली जाते तर दोन वर्षात तिसर्‍यांदा अशा प्रकारे तक्रार प्राप्त झाल्यास एजन्सीची मान्यता रद्द केली जाऊ शकते.सद्य स्थितीत घरगुती गॅस सिलेंडर धारकांना सिलेंडर च्या किमती सोबत सी जी एस टी तसेच एस सी एस टी टॅक्स च्या स्वरूपात टक्के रक्कम अतिरिक्त भरावी लागते.

ग्राहकाने स्वखुशीने कर्मचार्‍याला पैसे दिल्यास ते घेण्यास हरकत नाही मात्र ग्राहकाची फसवणूक करून पैसे वसुली करण्यासाठी कर्मचार्‍यांना परवानगी नाही. – प्रदीप कांबळे, पुरवठा अधिकारी (पनवेल तहसील विभाग)

Exit mobile version