। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील भालीवडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे दीपक कार्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, अशोक भोपतराव, शरद लाड, दीपक श्रीखंडे, रंजना धुळे, वृषाली क्षिरसागर, भूषण पेमारे, राजन क्षीरसागर, बंधू देशमुख, नंदू रुठे,अशपाक कर्णेकर, मोहन धुळे, तसेच तालुक्यातील व ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.