नेरेच्या उपसरपंचपदी दिपाली रोडपालकर

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
ग्रुप ग्रामपंचायत नेरेच्या उपसरपंचपदी दिपाली शशिकांत रोडपालकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बुधवारी 6 एप्रिल रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, पनवेल कृऊबाचे पनवेलचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, पुरोगामी रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जि.प.सदस्य विलास फडके, क्रांतिकारी सेवा संघाचे नामदेव शेठ फडके, नरेंद्र भोपी, बाळा फडके, शेखर शेळके, मेघनाथ म्हसकर, गजानन पाटील, मोहन कडू, बबन कदम, राष्ट्रवादीचे पनवेल तालुका अध्यक्ष दर्शन ठाकूर, शंकर ठाकूर, सुनील पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Exit mobile version