राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातील पानसई ग्रामपंचायतीत शिवसेनेने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्या गंगू कोळी यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत घरवापासी केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात या पक्षप्रवेशाने खळबळ उडाली आहे. पानसई ग्रामपंचायतीच्या सदस्या गंगू कोळी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र त्यांचा हा प्रवेश एक दिवशीय ठरला असून या आधीही असे प्रकार घडले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीला खो देत शिवसेनेत उडी
