चौल मुखरी मंदिर समोरील मुख्य रस्त्यातील मोरी बांधकामास विलंब

वाहतुक कोंडीची समस्याने प्रवासीवर्ग व वाहन चालक हैराण

| रेवदंडा | प्रतिनिधी |

एक महिना उलटला तरी अद्याप चौल मुखरी मंदिर समोरील मुख्य रस्तातील नुतन मोरी बांधकामाचे पुर्तता न होता मोरी बांधकामासाठी विलंब होत आहे, परिणाम येथून वाहतुक कोंडी समस्येला सामोरे जावे लागते.

रेवदंडा-अलिबाग या महत्वपुर्ण रस्तावर असलेल्या चौल येथून मिनिटागणीत वाहतुकीची रेलचेल असते, अलिबाग-रेवदंडा मुख्यः रस्ताचे नव्याने नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी चौल मध्ये मुखरी गणपती मंदिर नजीक असलेली मोरी सुध्दा नव्याने बांधण्यात येत आहे. परंतु, हे मोरी बांधकाम एक महिना उलटून गेला तरी संबंधित ठेकेदारांनी या कामाची अद्यापी पुर्तता केली नाही आहे. परिणामी या बांधकामास फारच विलंब होत असल्याने प्रवासीवर्ग संप्तत प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या नव्याने मोरी बांधकामाचे काम गेले महिनाभर सुरू आहे, त्यामुळे येथून एकमार्गी रस्ता ठेवण्यात आला आहे. शिवाय येथे गाड्या पास होत असताना वाहतुक नियत्रंक दिसून येत नाही. या रस्ताने मिनिटागणीत वाहतुक सुरू असल्याने येथे वाहतुक कोंडी निर्माण होते. गेले महिनाभर प्रवासीवर्ग तसेच वाहन चालकांना हा त्रास सहन करावा लागतो आहे.

चौल मुखरी गणपती नजीकच्या मोरी बांधकाम संबधीत ठेकेदाराने महिना उलटून गेला तरी पुर्ण न केल्याने प्रवासीवर्ग तसेच वाहन चालक यांनी संप्तत प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या नुतन मोरी बांधकामाची पुर्तता केव्हा होईल व येथून होत असलेली वाहतुक कोंडी केव्हा संपेल असा प्रश्न प्रवासीवर्ग व वाहन चालक विचारीत आहेत. या रस्तात पुढे अलिबागकडे जाताना चौल मध्ये दोन मोरी बांधकाम सुरू आहेत, ही कामे सुध्दा विलंबाने केली जात आहेत. मुख्य रस्ताला असलेले नुतन मोरी बांधकाम तत्परतेने पुर्तता होणे गरजेचे आहे. मात्र, संबधित ठेकेदार कामास गती देत नसल्याचा आरोप केला जात असून संबंधित खात्याने ठेकेदारास समज दयावी, अन्यथा ठेकेदार बदलून लवकरात लवकर काम पुर्ण करण्यात यावे अशी मागणी प्रवासीवर्ग तसेच वाहन चालक करत आहेत.

Exit mobile version