चौल दत्तमंदिरातील चोरी प्रकरणी पोलीस तपासात दिरंगाई

रेवदंडा पोलीस ठाण्यासमोरील श्रीदत्तमंदिरात महाआरती
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
चौल भोवाळे येथील स्वयंभू गुरुदेव श्रीदत्तमंदिरातील 15 डिसेंबर रोजी झालेल्या चोरीचा आजपर्यंत तपास न झाल्याच्या निषेधार्थ आज गुरुवार दि.16 मार्च 2023 रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यासमोरील श्रीदत्तमंदिरात महाआरती करुत पोलीस प्रशासनाच्या तपासातील दिरंगाईचा चौल रेवदंडा ग्रामस्थानी निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Exit mobile version