। उरण । वार्ताहर ।
उरण शहरातील वीर सावरकर मैदानासमोरील सह्याद्री बार जवळील पान टपरी धारकाने दुरुस्तीची कोणतीही परवानगी न घेता दुरुस्ती सुरू केली होती. याबाबत जागृत नागरिकांनी याची तक्रार नगरपालिका कर्मचार्यांकडे केली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. यावेळी संबंधित टपरी संशयास्पद आढळल्याने अधिकृत असल्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. टपरी धारकाने मालकाला सांगून कागदपत्र सादर करतो असे सांगितले होते. त्याला आठवडा उलटूनही वारंवार कल्पना देऊन ही कोणतेही कागदपत्रे टपरी धारक अथवा मालकाकडून देण्यात आलेली नाहीत. यामुळे ही टपरी अनधिकृत असल्याचा संशय बळाबला जात असल्याचे नगरपालिका कर्मचार्यांने सांगतीले आहे. तरी, ही टपरी अनधिकृत असल्यास ती त्वरित बंद करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.