अनधिकृत गतिरोधक काढणायची मागणी

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन शहरात वेगवान वाहनांची गती कमी करण्यासाठी बांधण्यात आलेले गतिरोधक नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. शहरातील जीवघेणे अनधिकृत गतिरोधक काढणायची मागणी केली जात आहे. शहरात प्रत्येक पाखडीत प्रत्येक आलीत आशाप्रकारे अत्यंत उंच असे जागोजागी गतिरोधक बनवण्यात आले आहेत. श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या गेटच्या दोन्ही बाजूला मोठमोठे दोन गतिरोधक बांधण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी याच गतिरोधकावरून अपघात घडल्याची घटना घडली होती. अत्यंत उंच व रुंदीचा कमी असलेल्या गतिरोधक दुचाकीस्वारांना धोकादायक ठरत आहेत. जागोजागी असलेले उंच गतिरोधक वाहनांना देखील हानीकारक ठरत आहेत. एखादी कमी उंचीची चारचाकी गाडी किंवा दुचाकी कमी वेगात या गतिरोधकावरून प्रवास करताना गाडीचा खलील मध्यभाग या गतिरोधकाला घासला जातो. तर कधी खलच्याबाजूला गाडी मोठ्याने आधळली जाते. त्यामुळे महागड्या गाड्यांचे नुकसान देखील होत आहे त्यामुळे मोठमोठे गतिरोधक हटवण्याची मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version