रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

। पनवेल । वार्ताहर ।

नवीन पनवेल परिसरातील बहुसंख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्यावतीने पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख यतिन देशमुख यांनी पनवेल महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांची भेट घेऊन नवीन पनवेल शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल निवेदन दिले. त्याचप्रमाणे महानगर गॅसचे काम करताना रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. यावर तत्काळ उपाय केले गेले नाहीत तर शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, अशी सूचना वजा इशारा देण्यात आला. यावेळी उपमहानगर प्रमुख किरण तावदारे, विभाग प्रमुख किरण सोनावणे, शाखा प्रमुख दिपक शेडगे, गोविंद जोग, ओमकार धावडे, मृण्मय काणे हे उपस्थित होते.

Exit mobile version