कर्जतमधील नागरिकांची लसीकरणासाची मागणी

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांची कोव्हिड लसीकरणासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे कर्जत नगरपरिषदने प्रत्येक वार्डमध्ये जाऊन लसीकरण करावे यासाठी कर्जत शहरातील नागरिकांनी निवेदन सादर केले. कर्जत शहरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने कर्जत नगरपालिका कार्यालयात जाऊन लसीकरणासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि पालिका मुख्याधिकारी यांची भेट घेतली. अ‍ॅड.कैलास मोरे, राजाभाऊ कोठारी, कृष्णा जाधव, जयवंत म्हसे, विनोद पांडे, अजय वर्धावे, प्रशांत उगले, मन्सूर बोहरी, मनोज निकम या नागरिकांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आणि पालिका मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्याकडे केल्या. नागरिकांच्या समस्या आणि मागणी याबाबत नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ.पाटील यांनी सकारात्मकता दाखवली आणि सहकार्य करून निश्‍चित मार्ग काढू असे सांगितले.

Exit mobile version