| कोलाड | प्रतिनिधी |
आपल्या फायद्यासाठी छुप्या मार्गाने रेशनिंग धान्य विक्री करणाऱ्या रेशन पुरवठा दुकानदार शरद उर्फ नाना शिंदे याचा परवाना रद्द करावा, अन्यथा रोहा तहसीलदारांच्या कार्यालयासमोर रेशनिंग ग्राहकांना घेऊन उपोषण करण्यात येईल, असा इशारा चिंचवली तर्फे अतोणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय मोते यांच्याकडून देण्यात आला आहे.
गारभट येथील रेशनिंग दुकानदाराने रेशनिंगचे धान्य छुप्या पद्धतीने रविवारी (दि.5) पाली येथील धनधांडग्या व्यापाऱ्याला विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामान्य जनतेसाठी आलेले धान्य बेकायदेशीररित्या वाहतूक करणारा धान्य पुरवठाधारक शरद उर्फ नाना शंकर शिंदे याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्यासह पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून 5 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे रेशन पुरवठा दुकानदार शरद उर्फ नाना शिंदे यांचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी चिंचवली तर्फे अतोणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय मोते यांनी केली आहे.
रेशनिंग परवाना रद्द करण्याची मागणी
