पुणे, ठाणे एसटी सुरू करण्याची मागणी

। तळा । वार्ताहर ।
तळा बसस्थानकातून तळा ते पुणे व तळा ते ठाणे एसटी बस सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. हा तालुका डोंगराळ दुर्गम असून या तालुक्यातील नागरिक हे व्यवसाय, नोकरी निमित्ताने ठाणे- नालासोपारा व पुणे विभागात अधिक प्रमाणात आहेत. या भागातून ये-जा करणार्‍यांची संख्या अधिक असल्याने या मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून तळा-पुणे व तळा-ठाणे गाडी सुरू करण्याच्या मागणीला जोर चढताना पहावयास मिळत आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात सण, उत्सव, गावच्या जत्रा असे विविध कार्यक्रम व गावागावात असणारे लग्न समारंभ यामुळे चाकरमानी मंडळी यांची गावाकडे ये-जा अधिक प्रमाणात वाढत असल्याने तळा-ठाणे व तळा-पुणे गाड्या पूर्वी प्रमाणे सुरू व्हाव्यात अशी मागणी होत आहे.

Exit mobile version