भरपावसात गाजर दाखवा निषेध आंदोलन

। रसायनी । वार्ताहर ।

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यात अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष निषेध आंदोलन करण्याचे आदेश दिली होते. त्या अनुषंगाने पक्षाच्या पनवेल विधानसभा व शहर जिल्हा युवकतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने नुकतेच अर्थसंकल्प जाहीर केला.या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदारात काहीच मिळालं नाही. केंद्राने महाराष्ट्राला गाजरं दाखविले आहे. राज्यात निधी आणण्यास राज्यातील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे अपयशी ठरले असून, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पनवेल विधानसभा व शहर जिल्हा युवक यांच्या वतीने पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भरपावसात केंद्र सरकारच्या विरोधात गाजर दाखवत जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पनवेल विधानसभा अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, युवक जिल्हाध्यक्ष शहाबाज पटेल, पनवेल शहर जिल्हा युवक आणि पनवेल विधानसभा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version