| महाड | प्रतिनिधी |
महाड नगरीत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोली कृषीदूतांनी वरंध या गावात ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना फळबागेमध्ये बोर्डो पेस्टचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यामध्ये बोर्डोपेस्टचे व्यवस्थापन कसे करावे, हे सांगितले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना बोर्डोपेस्ट व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, बोर्डो पेस्ट कशी तयार करावी व त्याचे फायदे देखील सांगितले. कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोलीचे प्राचार्य डॉ. व्ही.जे. गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वयक व विषयतज्ज्ञ डॉ. एस.एस रायकर, कार्यक्रम अधिकारी प्रा.एन.व्ही. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक दाखवले.
वरंध गावात बोर्डो पेस्टचे प्रात्यक्षिक
