खंडोबाच्या पालखीचे जेजुरीकडे प्रस्थान

| खोपोली । प्रतिनिधी ।

खंडोबा देवाच्या शिवमल्हार पालखीचे हाल येथुल जेजुरी गडाकडे पायी पालखी निघाली असून तिचे काल दस्तुरी येथे शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने राहण्याची सोय करण्यात आली. शिवमल्हार कुलस्वामिनी समाजीक संस्था हाल ता. शहापूर, जि. ठाणे यांच्या वतीने ही खंडोबाची पालखी श्री श्याम महाराज भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली असून यात सुमारे 300 भाविक भक्त सामील झाले आहेत, या पालखीचे हे 10 वे वर्ष आहे. हा पालखी सोहळा हाल ता शहापुर येथून निघाली असून ती सुमारे 7 दिवसानंतर जेजुरी गडावर पोहचणार आहे, यावेळी खंडोबा देवाचे गाणी, हरिनाम, भजन, गोंधळ यांच्या गजरात ही पालखी काढण्यात आली असून काल तिचे बोरघाटात दस्तुरी येथे राहण्याची सोय धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांनी केली होती. तर जेजुरी गडावर परतल्यानंतर घरी आल्यावर देवाच्या जागरण गोंधळंन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. यावेळी शिंग्रोबा उत्सव कमिटीचे सस्थापक अध्यक्ष बबन शेडगे, विवेक योगे, श्याम महाराज भाकरे आदींसह अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version