| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेलमधून एक वर्षाकरिता रायगड, ठाणे या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी अरिफ सौरभ शेखला ताब्यात घेऊन त्याच्यावर तळोजा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
अरिफ सौरभ शेख (रा. तळोजा) हा तळोजा पोलिसांना पोलीस ठाण्याच्या परिसरात फिरताना दिसून आला. एपीएमसी पोलीस ठाणे यांच्या रेकॉर्डवरील हा आरोपी असून, दोन महिन्यांपासून ठाणे, रायगड जिल्ह्यातून एक वर्षापासून हद्दपार केले असल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.