उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार

| मुंबई | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी मंगळवारी (दि.10) राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. प्रारंभी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागांचा पदभार स्वीकारला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांच्यासह आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version