चित्रलेखा पाटील यांचा दावा
भिलजी परिसरात विविध कामांचे उद्घाटन
। अलिबाग । वार्ताहर ।
शेकापच्या माध्यमातूनच अलिबाग तालुक्यातील विकासकामे केली जात असून, यापुढेही विकासकामांचा हा स्त्रोत असाच सुरु राहणार असल्याचा दावा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केला आहे.
अलिबाग तालुक्यातील भिलजी येथील विविध विकासकामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये रस्त्याचे भूमिपूजन, शेड आणि नळ पाणी योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमांना शेकापचे पदाधिकारी अरुण भगत, मधू ढेंबे, महेश झावरे, विक्रांत वार्डे, विश्वनाथ झावरे आदी उपस्थित होते. गावामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
आम.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्याचा नियोजनबद्ध विकास सुरु असून, जनहिताचा विचार करुनच आम्ही विकासकामांना प्राधान्य देत आहोत. यापुढेही हे धोरण राबवून विकासकामे केली जातील.- चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख