रसायनीत धम्मचक्र प्रवर्तन दिन

| रसायनी । वार्ताहर ।

रसायनी येथे सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शेठ गायकवाड यांच्या रिस येथील कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दस-याच्यादिवशी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौध्द धम्माची दीक्षा घेतली याला 66 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्तिने रसायनी परिसरातील सम्यक सामाजिक संस्थेच्यावतीने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त रिस येथे भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वातावरण सुगंधित करण्यात आले.

याप्रसंगी दिपक इंगळे, अजित कडलक, सुनिल निकाडे, महेंद्र जाधव, वृषाली कांबळे, मोहन कांबळे, मलीभाऊ कांबळे, दयानंद सरोदे, संपत पाठारे, जिवन तायडे, इंद्राज कांबळे, गणेश जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version