| चिरनेर | प्रतिनिधी |
ऐतिहासिक नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेद्वारे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ रंगकर्मी धनाजी काळू मुंबईकर (वय- 81) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. चिरनेरच्या श्री गणेश नाट्य मंडळाचे पदाधिकारी असलेल्या धनाजी मुंबईकर यांनी सत्तरहून अधिक ऐतिहासिक व सामाजिक नाटकात अभिनय केला. अभिनय कौशल्य आणि संवाद फेक अप्रतिम असल्याने, त्यांनी आपल्या दमदार आवाजातून संवाद फेक लोकांपर्यंत पुरेपूर पोहोचविली. त्यामुळे त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या आहेत. चिरनेर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर रविवारी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाट्यसृष्टीतील कलावंतांबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या निधनाने चिरनेरच्या नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 विवाहित पुत्र व 3 विवाहित कन्या असा आप्त परिवार आहे.
धनाजी मुंबईकर यांचे निधन
