। चिपळूण । प्रतिनिधी ।
मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल,खेडच्या धनंजय धुमाळ ( इ .9 वी ) याने कांस्य पदक पटकावून बालवैज्ञानिक पुरस्कार प्राप्त केला आहे.सन 2020- 21 मध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत यावर्षी पहिल्यांदाच होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा चार टप्प्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.
त्यामध्ये प्रथम पातळी वस्तुनिष्ठ परीक्षा द्वितीय पातळी प्रात्यक्षिक परीक्षा,अंतिम पातळी कृतिसंशोधन व मुलाखत अशाप्रकारे या परीक्षेचे स्वरूप होते.यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या धनंजय या विद्यार्थ्यांने होमिभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत कोव्हिड -19 संक्रमण,निदान,उपचार व लसीकरण या विषयावर स्वतः कृतीसंशोधन केले.अभ्यासू वृत्ती,जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर होमिभाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या चारही टप्प्यांमध्ये धनंजय याने उत्तम सादरीकरण करून उपस्थित परीक्षकांची मने जिंकत कांस्य पदकाला गवसणी घातली.धनंजय याने प्राप्त केलेल्या यशामुळे मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशनच्या वतीने होमिभाभा बालवैज्ञानिक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.सर्वात महत्वाची बाब म्हणजे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल,खेडच्या धनंजय धुमाळ या विद्यार्थ्यांने डॉ . होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत कांस्य पदक पटकावून रत्नागिरी जिल्हयात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.धनंजयच्या यशामुळे सर्वच स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.धनंजय याला अश्विनी पाटील,वैभव नांदिसकर,विक्रांत जाकरवार,राहूल एकघरे,रीटा पाटणे,विज्ञान विभागप्रमुख मीरा पवार,रिया पवार,तनुजा चव्हाण,तेजश्री क्षीरसागर,प्रयोगशाळा सहाय्यक सौ . प्राजक्ता जड्याळ व सर्व विज्ञान विषय शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.धनंजय याचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीन पाटणे,भूमिता पटेल,समन्वयक राहुल गाडबैल,सर्व पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
Related