मुंबई विभागीय जलतरण स्पर्धेत खेळणार ध्रुवी खाडे

| माणगाव | सलीम शेख |

बालपणापासूनच पोहण्याचा छंद असरणार्‍या बहिण भावाने सुरवातीच्या कालावधीत कोणतेही प्रशिक्षण व मार्गदर्शन नसताना जिद्द चिकाटी आणि ध्येय उराशी बाळगून सुरुवातीला शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेत भाग घेत विविध प्राविण्य मिळविले. त्यानंतर वेगवेगळ्या जलतरण स्पर्धेत खेळण्यासाठी दोघेही भाग घेऊ लागले. या स्पर्धेत कधी यश तर कधी अपयश मिळू लागले. मात्र मेहनत, जीद्द आणि चिकाटी या ध्येयापासून ते दूर गेले नाहीत. राज्यस्तरीय शालेय हॉकी खेळाडू राजेंद्र खाडे यांचा मुलगा अर्णव व मुलगी ध्रुवी हे बहिण भाऊ वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकीत इंग्रजी शालेय शिक्षणाबरोबरच जलतरण क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन करीत आहेत. ग्रामीण भागात कसलीही सोय नसताना जलतरणच्या 14 वर्षीय वयोगटातील विविध स्पर्धेत भाग घेतला. ध्रुवी राजेंद्र खाडे हिने सलग तीन वेळा सुवर्णपदक पटकावत रायगड जिल्ह्याची लाडकी बहीण शिलेदार ठरली असून ती आता मुंबई विभागात जलतरण स्पर्धेत खेळणार आहे. याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Exit mobile version