ध्रुवीचे जलतरण स्पर्धेत प्राविण्य

। माणगाव । प्रतिनिधी ।

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरूवारी (दि.15) उरण नगरपरीषद व हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला माणगाव येथील लीड स्कूल मुगवली मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये ध्रुवी राजेंद्र खाडे हिने 14 वर्षाखालील वयोगटातील 50 मीटर फ्री स्टाइल, 50 मीटर ब्रेस्ट्रोक, 50 मीटर बॅकस्ट्रो या जलतरण प्रकारात तीन रौप्य व 50 मिटर बटरफ्लाय या जलतरण प्रकारात एक सुवर्ण पदक जिंकून आपले जलतरण विभागातील स्थान उंचावले आहे. दहा वर्षाखालील वयोगटातील हीरल संजोग शेठ हिने 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये रौप्य पदक प्राप्त करून पदकाचे खाते उघडले आहे.

तसेच, बारा वर्षाखालील वयोगटातील अर्णव राजेंद्र खाडे, नभिया नाथांनी, मोईन हसन, तनिष्का वाकलेकर, आठ वर्षा खालील वयोगटातील आयांश वाकलेकर व शौर्य समीर म्हामुनकर हे जलतरणपटू सहभागी झाले होते. या सर्व जलतरांना उत्तम प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय जलतरण खेळाडू तथा प्रशिक्षक अभिनंदन दळवी देत आहेत. याकरिता माणगाव तालुक्यातील भादाव मधील मंगेश निंबाळकर यांनी त्यांचे स्विमिंग पूल मुलांना जलतरण प्रशिक्षणाकरिता उपलब्ध करून दिले आहे.

Exit mobile version