डान्स स्पोर्टमध्ये डायडाज स्टुडिओ सुवर्ण पदक विजेते

। चिपळूण । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य तिसर्‍या डान्स स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये पुन्हा एकदा डायडाज डान्स स्टुडिओ सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत. कल्याण येथे तिसरी महाराष्ट्र राज्य डान्स स्पोर्ट चॅम्पियनशिप पार पडली असून यामध्ये 6 वर्षा खालील डुएट गर्ल्स ह्या गटात सुवर्ण पदक रेहानशी दांडेकर व सिया शिर्के तर 12 वर्षा खालील सोलो गर्ल्स गटात मध्ये रौप्य पदक स्वरांजली निमकर तर सुवर्ण पदक अंतरा भुवड तसेच 6 वर्षा खालील फोक स्टाईल सोलो गर्ल्स गटात रेहांशी दांडेकर सुवर्ण पदक . तर 14 वर्षा खालील सोलो बॉईज मध्ये कुमार साद शेख सुवर्ण पदक जिंकले. तर 14 वर्षाखालील वेस्टर्न ग्रुप या गटामध्ये स्वरांजली निमकर, अंतरा भुवड, आदिती खेराडे, सिया शिर्के, साद शेख, साईराज महाडिक हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.

तसेच डायडाज स्टुडिओ ला 12 सुवर्ण पदक तर एक रौप्य पदक मिळून संपूर्ण स्पर्धेचे चॅम्पियनशिप चे मानकरी ठरले . या विद्यार्थ्यांना पुढील ऑल इंडिया चॅम्पियनशिप करिता निवड करण्यात आली असून. या स्पर्धेकरिता राष्ट्रीय कोच व डायडाज स्टुडिओ चे संचालक श्री. सुरज जाधव यांनी काम पाहिले. तसेच माजी नगरसेविका सौ. सिमताई चाळके ह्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version