आईसस्टॉक स्पोर्ट्स समर चॅम्पियनशिप स्पर्धा
। रायगड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र आईसस्टॉक स्पोर्ट्स असोसिएशनद्वारे आयोजित राज्य आईसस्टॉक स्पोर्ट्स समर चॅम्पियनशिप 25 ऑगस्ट 2024 मध्ये सोलापूर येथील के.एन.भिसे कॉलेज येथे संपन्न झाली. या स्पर्धेत रायगड संघातील सहभागी खेळाडूंनी यश संपादन केले. वरिष्ठ गटात योगेश माळी याने रौप्य आणि कांस्य पदक तर संस्कृती घरत हिने सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावले.
कनिष्ठ गटात हामजा भगत हिने सुवर्ण, रौप्य, आणि कांस्य पदक, हुजेफा लखडवालाहिने 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक, तन्वी शेलार हिने सुवर्ण आणि कांस्य पदक तर कासिम शेख याने सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावले.महाराष्ट्र आईसस्टॉक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश राठोड आणि रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधी संस्कृती घरत, संजय भोईर आणि वैभव राणे यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळाली.