खारघरमध्ये सिडकोच्या कारवाईदरम्यान आदिवासी बांधवाचा मृत्यू?

घरात झोपलेले असताना घर पडल्याचा स्थानिकांचा दावा; खारघर पोलीस ठाण्यात गर्दी

। पनवेल । प्रतिनिधी ।

बेलपाडा आदिवासी वाडीत सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू असताना बाळाराम कांबडी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे. संबंधित व्यक्ती घरात झोपलेली असताना कारवाईदरम्यान घर पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी खारघर पोलीस ठाण्यात गर्दी केली असून, घटनेबाबत सविस्तर माहिती आणि अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Exit mobile version