भाकरीपाडा शाळेत डिजिटल क्लासरूम

। नेरळ । वार्ताहर ।
सामजिक क्षेत्रात काम करणार्‍या थिंक शार्प फाउंडेशन कडून जिल्हा परिषदेची शाळा भाकरीपाडा येथील शाळेसाठी डिजिटल क्लासरूम आणि स्टडी रुम व साहित्य भेट देण्यात आले. थिंक शार्प फाउंडेशनचे प्रमुख अमित कोतुळ आणि पष्टे यांनी भाकरीपाडा शाळेत जावून हे साहित्य शाळेच्या मुख्याध्यापक यशवंत वाघरे यांच्याकडे दिले. त्यावेळी भाकरीपाडा गावातील ग्रामस्थ आणि पालक शाळेचे शिक्षक संभाजी केंगार, सुभाष जमदाडे, इंदिरा कोरडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version