रोटरी क्लबचा डिजिटल स्कूल उपक्रम
| वाघ्रण | वार्ताहर |
जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील शाळा ई-सक्षम करण्याच्या उद्देशाने सह्याद्री इंडस्ट्रीजच्या सीएसआरमधून डिजिटल क्लासरूम या योजनेतून शाळेला, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सक्षम करण्याकरिता 40 अँड्रॉइड टीव्ही तसेच पहिली ते दहावी अभ्यासक्रमासहीत पेनड्राईव्ह प्रदान करण्यात आले. हा उपक्रम ज.शि.मं. प्राथमिक शाळा सारळ येथे गुरुवार, दि. 8 सप्टेंबर रोजी पार पडला. रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट आणि रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
अलिबाग आणि सुधागड तालुक्यातील खालील शाळांतील संचाचे उद्घाटनप्रसंगी जनता शिक्षण मंडळाची प्राथमिक शाळा, सारळचे शिक्षक श्री. मढवी, अन्य शिक्षक, जिल्हा परिषद मराठी शाळा, दिघेवाडी, सुधागड-पाळी येथील संजय थळे, इतर शिक्षक आणि शाळा सुधार समिती सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोरचे अध्यक्ष रोटरीयन डॉ.निलेश म्हात्रे, सचिव रो. दिलीपकुमार भड, खजिनदार रो. जनार्दन चापाडे, मेंबरशिप डायरेक्टर रो. कुमार जोगळेकर, तसेच क्लबचे जी.एस.आर. रो. दीपक खोत आवर्जून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा कशी सक्षम होणार आहे याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात, या संचामुळे त्यांना अभ्यास अवगत करणे कसे सोपे आणि आवडीचे झाले आहे, याबद्दल सांगितले. त्यांनीही सर्व रोटरी परिवार तसेच सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे आभार मानले. दरम्यान, सर्व शिक्षक आणि शाळा विकास समिती यांनी रोटरीचे आभार व्यक्त केले.